Pudinalagwad yashogatha
पुदिना पूर्व मशागत कशी करावी

पुदिना पूर्व मशागत कशी करावी

पुदिनापुदिना जमिनीतून मुख्य अन्नद्रव्ये जास्त प्रमाणात शोषून घेतो. या पिकास समशीतोष्ण व शीतोष्ण हवामान मानवते, परंतु हवेतील आर्द्रता या पिकास अतिशय अनुकूल असते. हे पीक 500 ते 1500 मि.मी. पर्जन्यमान असलेल्या प्रदेशात चांगले येते.या पिकास पोयट्याची भरपूर सेंद्रिय खते असलेली, खोल ओलावा टिकवून ठेवणारी, निचऱ्याची जमीन चांगली मानवते. हे पीक मध्यम, भारी पोयट्याच्या जमिनीत घेणे चांगले ठरेल. कारण अशा जमिनी फांद्यांच्या वाढीस पोषक ठरतात. जमिनीचा सामू 6 ते 7.5 असावा. या पिकास 40 अंश फॅ. ते 105 अंश फॅ. तापमान मानवते. लागवडीच्या वेळेस पाऊस व लागवडीच्या वेळेस स्वच्छ सूर्यप्रकाश पोषक ठरतो. धुके, सावली व जोरदार वारा वाढीस प्रतिकूल ठरतो.
पूर्व मशागत
प्रथम जमिनीची खोल नांगरट करावी व नंतर 2 ते 3 कुळवाच्या पाळ्या द्याव्यात. जमीन पसरट करण्यापूर्वी गवत, तसेच इतर खोडे वेचून घ्यावीत. 20 ते 25 गाड्या चांगले, कुजलेले शेणखत मिसळावे. लागवड विशेषतः सपाट वाफ्यावर करावी, परंतु 45 सें.मी. अंतर ठेवून सरी-वरंब्यावरसुद्धा याची लागवड करता येते.
लागवड
पुदिन्याची लागवड जमिनीलगत पसरणाऱ्या फांद्यापासून (सर्कस, स्टोलन किंवा रणर्स) करतात. अशा फांद्या डिसेंबर ते जानेवारी महिन्यात भरपूर फुटतात. 5 ते 10 सें.मी. लांबीच्या 3-4 मि.मी. जाड फांद्यापासून 45द15 सें.मी. अंतरावर सपाट वाफ्यामध्ये किंवा सरी वरंब्यावर 2 ते 3 सें.मी. खोल लागवड करावी.
िवाळ्यात जवळपास 3 ते 4 टन प्रति हेक्‍टर स्टोलन मिळतात. जास्त उत्पादनासाठी जानेवारीच्या शेवटी किंवा फेब्रुवारीच्या सुरवातीला लागवड करणे सोयीचे ठरते. लागवडीच्या वेळी प्रति हेक्‍टरी 40 किलो नत्र, 60 किलो स्फुरद व 80 किलो पालाश द्यावा. लागवड केल्यानंतर ताबडतोब पाणी द्यावे. पिकाच्या जोमदार वाढीसाठी जमिनीमध्ये ओलावा ठेवणे आवश्‍यक असते. साधारणपणे 8 ते 12 दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. लागवडीनंतर 30 ते 40 दिवसांनी व 60 ते 70 दिवसांनी प्रति हेक्‍टरी 30 किलो नत्राचा हप्ता द्यावा. पीक सुरवातीच्या काळात तणरहित ठेवणे आवश्‍यक आहे. त्यासाठी खुरपणी व कोळपणी करावी. प्रत्येक कापणीच्या आधी 2 ते 3 वेळा खुरपणी करणे सोईस्कर ठरते.
कापणी व उत्पादन
िसेंबर, जानेवारी महिन्यात लागवड केलेल्या पिकाची पहिली कापणी एप्रिल, मे महिन्यात करावी. पीक फुलोऱ्यावर येण्यापूर्वी करावी. दुसरी कापणी जुलै-ऑगस्टमध्ये करावी. पिकाची चांगली काळजी घेतल्यास तिसरी कापणी ऑक्‍टोबरमध्ये करता येते. पहिल्या कापणीपासून सर्वात जास्त उत्पादन मिळते. पुदिन्याचे हिरव्या झाडाचे प्रति हेक्‍टरी सरासरी 25 ते 30 टन उत्पादन मिळते. पुदिन्याचे तेल उर्ध्वपातन पद्धतीने काढतात. वाळलेल्या झाडापासून तेल काढणे सोपे असते, त्यासाठी 25-30 अंश सेल्सिअस तापमानात शेतात वाळविल्यानंतर तेल काढावे.
तेलाचे प्रमाण
जपानी मिंट व बरगॉट (ऑरेंज) मिंट 0.4-0.5 टक्के पेपरमिंट व स्पीअर मिंट 0.2-0.3 टक्के.
पुदिन्याच्या जाती
एम.ए.एस.- 10.8-1.0 टक्के तेलाचे प्रमाण तेलात 81 टक्के मॅथॉलचे प्रमाण, तेलाचे उत्पन्न 290 ते 293 किलो/हे.हायब्रीड-77 - संकरण पद्धतीने तयार केलेले वाण (एम. ए. एस.- 1 द एम. ए. एस-2)उत्पन्न 762 क्विंटल/हे. तेल - 468 किलो / हे. 81.5 टक्के मॅथॉलचे प्रमाण, पानावरील ठिपके व तांबेरासाठी प्रतिबंधक वाण. - इ.सी.-41911.