lagwad mahiti bawaskar Agrowone
दोडका माहितीपूर्ण-व्हिडिओ

दोडका माहितीपूर्ण-व्हिडिओ

जमीन
मध्यम काळी , पाण्याचा चांगला निचरा होणारी.

भरखते
१५ ते २० टन शेणखत प्रति हेक्टरी.

सुधारित जाती
पुसा नसदार, कोकण हरिता, खाजगी कंपन्यांचे संकरित वाण

पेरणीची वेळ
खरीप - जून-जुलै, उन्हाळी - जानेवारी -फेब्रुवारी

लागवडीचे अंतर
१.५ x १.० मीटर (ताटी पध्द्त) बियाण्याचे प्रमाण :२ ते २.५ किलो/ हेक्टरी

रासायनिक खते
लागवडीपूर्वी -५०:५०:५० किलो नत्र:स्फुरदः पालाश प्रति हेक्टरी, लागवडीनंतर-३०,४५ व ६० दिवसांनी
५० किलो प्रति हेक्टर नत्र खताची मात्रा तीन समान हप्त्यात विभागून द्यावी.

पिकाचा कालावधी
१४० ते १५० दिवस

पीक संरक्षण
फुलकिडे, मावा  व पांढरी:
पिले आणि प्रौढ पानातील रस शोषून घेतात त्यामुळे पाने वाकडी होतात. तसेच हे कीटक माशी विषाणूजन्य रोगाचा प्रसार करतात.
नागअळी:
अळी पानाच्या आत राहून आतील भाग खाते त्यामुळे पानावर नागमोडी रेषा तयार होतात.
फळमाशी:
अळया फळात राहुन आतील गर खातात त्यामुळे फळे सडतात आणि अकाली पक्व होतात.

नियंत्रण
क्ल्यु ल्युर कामगंध सापळे एकरी ५ या प्रमाणात वापरावे. ५ % निंबोळी अर्काची फवारणी करावी.

उत्पादन
१५ ते २० टन प्रति हेक्टरी.