फूलकोबी काढणी व मळणी
|
सुधारित वाण
मे-जून - पुसा दिपाली, पंजाब कुआरी, पुसा केतकी
जूलै-ऑगस्ट - इम्पुव्हड जापानीज, पंत शुभ्रा, पाटणा मिडसिझन
सप्टेंबर-ऑक्टोबर - पूसा सिंथेटिक, पूसा शुभ्रा, हिसार-१
नोव्हेंबर - डिसेंबर - स्नो बॉल१६, के - १, स्नोबॉल - १.
बियाण्याचे प्रमाण
६०० ते ७५० ग्रॅम/ हेक्टरी, हंगामानुसार वाण निवडणे महत्वाचे आहे.
लागवडीचे अंतर
६० x ४५ सें.मी. किंवा ४५ x ४५ सें.मी.
खतांची मात्रा
२० टन शेणखत, १५०:७५:७५ किलो नत्र:स्फुरदः पालाश प्रति हेक्टरी, ५० टक्के नत्र, संपूर्ण स्फुरद व पालाश लागवडीच्या वेळी व उर्वरित ५० टक्के नत्र लागवडीनंतर १ महिन्याने द्यावे.
आंतरमशागत
१५ ते २० दिवसाच्या अंतराने नियमीत खुरपणी करावी.
पाणी व्यवस्थापन
८ ते १० दिवसाच्या अंतराने व गरजेनुसार पिकाला पाणी देणे.
पिकाचा कालावधी
जाती परत्वे ७० - १०० दिवस.
पीक संरक्षण मावा
डायमेथोएट ३०% इ.सी. २० मिली १० लि. पाण्यात मिसळून फवारणी करावी. किंवा निंबोळी अर्क५% फवारावा.
चौकोनी ठिपक्याचा पतंग व्यवस्थापन आराखडा
१. लागवडीपूर्वी मुख्य पिकाच्या कडेने मोहरी पेरावी. मुख्य पिकाच्या २५ ओळी नंतर २ओळी मोहरी पेरावी.
२. शेतात पक्षी बसणेसाठी काठीचे मचान लावावेत.
३. एकरी ५ फेरोमन कामगंध सापळे लावावेत.
४. फुलकोबी पिकावर १ली फवारणी २ अळया प्रति रोप दिसू लागताच बी.टी. १० ग्रॅम १० लिटर पाण्यातून (संध्याकाळी), ट्रायकोग्रामा बॅक्ट्री कीटक प्रति हेक्टरी १ लाख या प्रमाणात सोडावेत.
५. दुसरी फवारणी ५ टक्के निंबोळी अर्काची करावी.
६.तिसरी फवारणी गरज भासल्यास फेनव्हेलरेट २०% इ.सी. ५ मिली १० लिटर पाण्यातून करावी.
७. चौथी फवारणी ५ टक्के निंबोळी अर्काची करावी. करपा (ब्लॅक : मॅन्कोझेब + स्टीकर १० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारावे. लिफ स्पॉट)
करपा (ब्लॅक लिफ स्पॉट)
मॅन्कोझेब + स्टीकर १० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारावे.
उत्पादन
२० - २५ टन/हे.