kakdi price
काकडी आंतरपिके

काकडी आंतरपिके

सुधारित वाण
हिमांगी, फुले शुभांगी.

पेरणीची वेळ
खरीप - जून-जुलै, उन्हाळी-जानेवारी-फेब्रुवारी

बियाण्याचे प्रमाण
१ ते १.५ कि./हे.

लागवडीचे अंतर
१.० ४०.५ मी.

खतांची मात्रा
२० टन शेणखत, १००:५०:५० किलो नत्र : स्फुरद : पालाश प्रति हेक्टरी द्यावे, लागवडीपूर्वी अर्धे नत्र, संपूर्ण स्फुरद व पालाशची मात्रा द्यावी.
अर्ध्या नत्राची मात्रा लागवडीनंतर ३० व ४५ दिवसांनी दोन समान हप्त्यात विभागून द्यावी.
अ) १५ ते २० दिवसाच्या अंतराने नियमीत खुरपणी करावी.
ब) लागवडीनंतर एक महिन्यांनी वर खतांच्या मात्रा द्याव्यात.

पाणी व्यवस्थापन
८ - १० दिवसाच्या अंतराने हंगाम व गरजेनुसार पाण्याच्या पाळ्या द्याव्यात.

रस शोषणारी कीड
मावा व तुडतुडे नियंत्रणासाठी इमिडॅक्लोप्रीड ७०% डब्ल्यु. जी ०.७ ग्रॅम प्रति १० लि. पाणी या प्रमाणात फवारावे.
डाऊनी मिल्ड्यु  (केवडा) व भूरी
नियंत्रणासाठी अझोक्झिट्रोबिन १० मि.ली. किंवा सायमॉझॉनिल + मॅन्कोझेब २५ ग्रॅम प्रति १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

उत्पादन
१५ - २० टन प्रति हेक्टर