mula lagwad kashi karavi D
मुळा आंतरपिके

मुळा आंतरपिके

जमीन
हलकी ते रेताड, मध्यम, निचऱ्याची.

भरखते
२० ते २५ टन शेणखत प्रति हेक्टरी.

सुधारित जाती
पुसा देशी, पुसा केतकी, पुसा रेशमी.

पेरणीची वेळ
रब्बी - सप्टेंबर- नोव्हेंबर.

लागवडीचे अंतर
सपाट वाफे, ३० x १५ सें.मी.

बियाण्याचे प्रमाण
८ ते १० किलो/ हेक्टरी.

रासायनिक खते
लागवडीपूर्वी २०:२०:८० किलो नत्र:स्फुरदः पालाश प्रति हेक्टरी लागवडीनंतर एक महिन्याने
१० किलो प्रति हेक्टर नत्र खताची मात्रा द्यावी.

पिकाचा कालावधी
४५ ते ६० दिवस.

उत्पादन
१० ते २० टन प्रति हेक्टरी (मुळा काढताना जमिनीत मोडणार नाहीत या बेताने उपटावेत).