जमीन
हलकी ते मध्यम.
जाती
कृष्णा, कांचन, चकैय्या व निलम.
लागवडीचे अंतर
७.० ४ ७.० मीटर.
खते
पूर्ण वाढलेल्या झाडास ४० ते ५० किलो शेणखत, ५०० ग्रॅम नत्र , २५० ग्रॅम स्फुरद व २५० ग्रॅम पालाश प्रति झाड प्रति वर्ष. नत्र दोन हफ्त्यांमध्ये विभागून द्यावे.
उत्पादन
७५ ते १२५ किलो / झाड (५ वर्षांवरील झाड)होते. या शिवाय या पिकात स्टायलो हेमॅटा या चारा पिकाची लागवड फायदेशीर दिसून आली आहे.
इतर महत्वाचे मुद्दे
१) लागवडीपूर्वी रोपांवर सुधारित वाणाचे कलम केले असल्याची खात्री करून मगच लागवड करावी.
२) भरपूर उत्पादन आणि अधिक आर्थिक उत्पन्न मिळण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातील आवळ्याच्या लागवडीसाठी कांचन वाणाबरोबर जास्त परागीभवनासाठी १०% कृष्णा या वाणाची लागवड करण्याची शिफारस करण्यात आलेली आहे.
३) पावसाळा लांबल्यास जून-जुलै महिन्यात फळगळती कमी करण्यासाठी एखादे संरक्षित पाणी द्यावे.
४) पावसाचे पाणी जमीनीत मुरविण्यासाठी उताराच्या विरुद्ध दिशेने बांध घालावेत किंवा झाडाच्या खोडाभोवती इंग्रजी (v) आकाराचे बांध घालावेत.
५) फळगळतीचे प्रमाण कमी करण्यासाठी बागेत मधमाश्यांचे पेटारे ठेवावीत.
६) जमिनीत वापसा स्थिती जास्त टिकविण्यासाठी सेंद्रिय निविष्ठांचा आच्छादनासाठी उपयोग करावा.